गंगापूर, (प्रतिनिधी): माणुसकी जपूया तरच लोककल्याणकारी रामराज्य होईल असे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले.
प्रत्येक समस्येचे मूळ विकृती असून ज्ञानाचे आचरण करणारा राम ठरला तर दुराचरण करणारा रावण ठरला. त्यामुळे समाजाने ज्ञानाचे आचरण करणे आवश्यक आहे. पूर्वी लोकांना अशिक्षित ठेवून गुलाम बनविले जायचे, पण सध्या त्यांना आकर्षित करून गुलाम बनविले जात आहे.
सगुणच माणुसकी जपू शकतो. सगुणांद्वारे अवगुण सोडवूया. अन्य वाहेगाव तालुका गंगापूर येथे रामजन्मोत्सव निमित्ताने सात दिवस रामानाचार्य गितांजलीताई झेंडे कुलकर्णी यांची रामकथा व अंखड हरिनाम सप्ताह गोदाधाम सराला बेट परंपरेतील मंहत रामगिरीजी महाराज यांच्या कीर्तनाने झाले रामराज्य काय उणे आम्हासी या संत तुकाराम महाराजांच्या अभंग रचनेचे विवेचन करताना महंत रामगिरी महाराज म्हणाले की, माणूस सध्या माणुसकीला विसरत चालला आहे.
सत्य काय आहे, हे समजून घेण्यासाठी माणसाने ज्येष्ठांच्या अनुभवाचा आधार घेणे आवश्यक आहे पण आपण असे
करतो का, हाच खरा प्रश्न आहे. मानवाची उत्क्रांती होत असताना आपण कपड्याविना राहत होतो त्यावेळी कपडे नसतानाही माणसामध्ये वासना नव्हती. पण आता कपडे असून देखील त्यांच्यामध्ये पावित्र्यता आणि संयम राहिला नाही. माणसाने संयम जपला पाहिजे. काम, क्रोध, अहंकार, वासना, घृणा, इर्षा यावर काळ आणि परिस्थिती हाच उपाय आहे.
अशा वेळी संयमच सरवाधिक उपयोगी पडतो. माणुसकीचा धर्म समाजासाठी आवश्यक आहे. आपण माणुसकी जपली पाहिजे. माणुसकीचे सर्व गुण आढळणारे राम असतात, म्हणून आपल्या मनाला सुमन बनवा म्हणजे राम अंतरंगात वास करेल. असा उपदेश गोदाधाम सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी वाहेगाव तालुका गंगापूर येथील राम मंदिर जन्मोत्सव किरतन प्रसंगी उपस्थित भाविकांना केला.
याप्रसंगी प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश पा गंलाडे, जिल्हा परिषद सदस्या वैजयंती वाल्मीक सिरसाठ, ऊपसभापती राजेश्वर पा हिवाळे, सोहम पालेजा, वाल्मिक शिरसाठ, रामभाऊ महाराज, संतोष सोंळकी, दत्तु खपके, गोदाधाम सराला बेटाचे












